Read the passage below and answer the question.

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. रवींद्रनाथ टागोर या महाकवीचं स्वातंत्र्याचं स्वप्न मंगल आणि उदात्त होतं. रवींद्रनाथांचा व्यासंग फार मोठा होता. सतत वाचन करणं हा त्यांचा छंद होता. रवींद्रनाथ जसे थोर कवी होते तसेच ते थोर कांदबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत, चित्रकार व संगीतकारही होते. शाळेच्या घराच्या चार भिंतीआड त्यांचं मन रमत नव्हते. निसर्गात रवींद्रनाथ जास्त रमत. फुलं, फुलपाखरं, पक्षी, झाडं यांचं त्यानां विलक्षण आकर्षण. जमीन, शेतं, डोंगर, नया, झरे आणि क्षितिजाला भिडणारा सागर या सान्यांविषयी रवींद्रनाथांना खूप प्रेम होतं. रवींद्रनाथांनी वंगभंग विरोधी चळवळीत सहभाग घेतला होता. 'भांडार' नावाचं मासिक ते चालवत असत. खेड्यांमधून पसरलेला भारताचा विकास होण्यासाठी ग्रामोद्धार व्हायला हवा याची त्यांना जाणीव होती, म्हणूनच त्यांनी शांतीनिकेतनला जोडून ‘श्रीनिकेतन' उघडलं. ग्रामोद्धाराच्या केंद्रात शेती, गो-पालन, चर्मोदयोग, हातमाग, कलाकुसरीचं काम या व्यवसायाचं शिक्षण दिल जाऊ लागलं. त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहामुळे सारं जग त्यांना ओळखू लागले. याच काव्याला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वातील एकत्वाचा सुंदर अविष्कार म्हणजे त्यांचे जनगणमन हे गीत. स्वतंत्र भारताचे ते राष्ट्रगीत आहे.

उताऱ्यातील आशयानुसार ग्रामोद्धार केंद्रात कोणते शिक्षण मिळत नव्हते?

Model Answer & Options

Source: Previous Question Papers

शेती व गो-पालन

चर्मोद्योग व हातमाग

संगणक शिक्षण

कलाकुसर

Take Topic Quiz

Test your understanding of this topic with instant AI feedback.

Start Interactive Test