Question 1
पुढीलपैकी नाम असलेला शब्द पर्यायांमधून निवडा.
Options
तलवार
दानशूर
मुसळधार
लवकर
Complete guide to "Grammar (Gender, Number, Tense, and Vibhakti)" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.
Try our interactive quiz on this topic to get instant AI feedback.
पुढीलपैकी नाम असलेला शब्द पर्यायांमधून निवडा.
तलवार
दानशूर
मुसळधार
लवकर
फुगा या नामासाठी कोणता क्रियादर्शक शब्द लागू पडत नाही?
फुगवणे
फोडणे
उडवणे
चवताळणे
पुढीलपैकी कोणत्या नामाचे अनेकवचन करताना त्या नामाच्या रुपात बदल होत नाही?
बेडूक
वासरू
बगळा
मडके
‘बागेत मोगरा जाई गुलाब पारिजातक व चाफा ही फुलझाडे आहेत.’ या वाक्यात एकूण कितीवेळा स्वल्पविराम द्यावे लागेलॽ
तीन
चार
दोन
एक
पुढे दिलेल्या शब्दांमध्ये एकूण किती शब्द अशुद्ध आहेतॽ रिमझीम, परिसर, प्रदुषण, मर्कट, सज्जण, झिम्मा, निरिक्षण, दुष्काळ, आशीर्वाद
तीन
सहा
चार
पाच
‘थुईथुई मोर नाचती अपुल्या अंगणी’ या वाक्यात आलेले क्रियापद ओळखा.
नाचती
थुईथुई
अंगणी
अपुल्या
पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द कोणाता नाही?
सावली
नोकरी
नाणी
पापणी
पुढीलपैकी पुल्लिंगी नाम असलेला पर्याय निवडा.
औषध
कोकीळ
झूल
टेकडी
पुढील वाक्यात आलेल्या नामांची एकूण संख्या किती? ‘रेश्माने वर्गात निळ्या ज्योतीवर ते पत्र धरले होते.’
सहा
पाच
चार
तीन
खालील वाक्यातील नामांची संख्या किती? वाक्य - ‘जंगलातील उंदराचे धैर्य पाहून सिंहाला आनंद झाला.’
चार
दोन
तीन
पाच
पुढील वाक्यातील क्रियापद ओळखा. वाक्य - ‘त्याचे गाणे सगळ्यांना आवडले.’
आवडले
गाणे
त्याचे
सगळ्यांना
पुढीलपैकी नपुंसकलिंगी नाम असलेला पर्याय कोणता?
आभाळ
झरे
कागद
तारे
पुढीलपैकी निश्चितपणे एकवचन असलेला पर्याय कोणता?
ग्रह
घर
पर्वत
पाने
‘किण् किण्’ हा ध्वनीदर्शक शब्द कोणत्या नामाशी संबंधित आहे?
बांगडी
घुंगरू
नाणी
ढोलकी
पुढील शब्दसमूहाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी योग्य क्रियापदाचे रूप निवडा. ‘मी उड्या मारत उंच कड्यावरून वेगाने ______.’
कोसळतात
पडतात
कोसळते
पडणे
पुढील वाक्यात एकूण किती नामे आलेली आहेत? वाक्य - ‘पावसाचा आवाज कमी होताच मारियाने खिडकी उघडली.’
तीन
चार
पाच
दोन
विरूद्धलिंगी शब्दांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी चुकीची जोडी निवडा.
श्रीमान - श्रीमती
उंट - सांडणी
बालक - बालके
बोका - भाटी
पुढीलपैकी कोणत्या शब्दांचे अनेकवचन करताना त्या शब्दामध्ये बदल होईल?
फूल
रंग
पक्षी
पर्वत
पुढीलपैकी नाम नसलेला शब्द निवडा.
वर्ग
हुशार
अभ्यास
प्रवाह
दिलेल्या नामाचे विरुद्धलिंगी नाम ओळखा - नर्तक.
नर्तन
नुर्तकी
नर्तिका
नायिका
खालील शब्दगटातील निश्चितपणे अनेकवचनी असणारा शब्द ओळखा.
चटई
डहाळी
शेतकरी
टेकडी
दिलेल्या वाक्यात एकूण किती नामे आली आहेत? वाक्य - ‘सोहमच्या नवीन सायकलला दोन आरसे आहेत.’
दोन
चार
तीन
एक
पुढीलपैकी कोणते क्रियापद नाही?
घे
दे
ने
हे
दिलेल्या पर्यायांतून विरुद्धलिंगी शब्दांची चुकीची जोडी निवडा.
मालक - नोकर
युवक - युवती
श्रीमान - श्रीमती
बाहुला - बाहुली
दिलेल्या पर्यायांतून निश्चितपणे अनेकवचनी शब्द निवडा.
झोळी
पोळी
ओळी
मोळी
पुढे दिलेल्या कोणत्या वाक्यात नाम आले नाही?
त्याने गुढी उभारली.
आपण घरी यावे.
तू लवकर पोहोच.
आम्ही गाणे म्हटले.
दिलेल्या वाक्यातील ‘दरवाजे’ या शब्दाचे लिंग ओळखा. ‘सायंकाळ होताच गडाचे दरवाजे बंद झाले.’
नपुंसकलिंग
स्त्रीलिंग
पुल्लिंग
उभयलिंगी
दिलेल्या विधानातील क्रियापद ओळखा. ‘सकाळच्या वेळी पक्षी गातील सुरात’’.
वेळी
गातील
सुरात
पक्षी
पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी नाम कोणते?
कोळी
माळी
जाळी
तळी
पुढे दिलेल्या कोणत्या वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येईल?
काय रे बाबा, कपडे आणलेस का
तुझा प्रामाणिकपणा मला आवडला
कपाटातील पैसे गेले कुठे
एवढ्या सामानाला किती रूपये लागले गं आई
अशुध्द शब्द पर्यायांतून निवडा.
बक्षिस
धुऊन
भिती
हुतुतू