Source: Previous Question Papers

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. निसर्गाची नानाविधरूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते. त्याचा मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो. तो निरपेक्षपणे आपले सर्वस्व प्राणीमात्रांना बहाल करतो. आपले तर जीवनच पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वनस्पती फळे, फुले, निवाऱ्यासाठी लाकडे, शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी सावली सुद्धा देतात. औषधी वनस्पती, इमारती लाकडासाठीच्या वनस्पती, कापडासाठी कापूस देणारी पिके, कागद, रबरी वस्तू बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष या प्रमाणेच इंधनासाठी लाकडे देणाऱ्या वनस्पतीच असतात. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांचाही माणसाला खूप उपयोग होतो. अन्नातील दूध, मांस, अंडी यांसारखे पदार्थ, वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे प्राणी केस किंवा चामड्याच्या वस्तूसुद्धा प्राण्यांपासून मिळतात. समुद्रातील मासे, शंखशिंपले किंवा मीठ सुद्धा आवश्यकच आहे. पाऊस तर सर्वच सजीवांचे जीवन फुलवतो. नद्यांचा प्रवाह शेतीवाडीला संजीवनी देतो. काही ठिकाणी नद्यांचा अंतर्गत वाहतुकीसाठी उपयोग होतो. खरोखर निसर्ग मानवाचा खराखुरा मित्रच आहे.

उताऱ्यातील वर्णनानुसार सर्व सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणती?

Options

Option A

नद्या

Option B

समुद्र

Option C

इमारत

Option D is correct

पाऊस