Questions & Answers: "Prose Comprehension"

Complete guide to "Prose Comprehension" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.

39 Questions

Want to Test Your Knowledge?

Try our interactive quiz on this topic to get instant AI feedback.

Take Topic Quiz

पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली दिलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. माझा हा पसारा फांद्या फांद्यांनी वाढतो घरट्यात पाखरांना खुशीचा सांगावा धाडतो. पानाफुलांचा बहर गंध फळांचा सांडतो आसऱ्याला येता जीव खेळ सुखाचा मांडतो. कुशीत साऱ्यांना घेऊन मी खुशाल डोलतो कितीही मोठा झालो नाते मातीशी सांगतो. नाही कटुता मनात गुण्या गोविंदाने राहू ऊन वारा पावसात एकमेकां आधार देऊ. झाडाचे हितगुज जेव्हा येते कानी झाड आजोबाच वाटे सांगतो हिरवी कहाणी.

Question 1

1 Mark

कवितेत हितगुज कोण साधत आहेॽ

Options

Option A

पक्षी

Option B

चारा

Option C

फुले

Option D is correct

झाड

Question 2

1 Mark

कवितेच्या आशयानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणतेॽ

Options

Option A

मी सकलांना कुशीत घेऊन आनंदाने डोलतो.

Option B

मी घरट्यातील पक्ष्यांना खुशीचा सांगावा सांगतो.

Option C is correct

मी मोठे झाल्यावर मातीशी नाते विसरतो.

Option D

मी ऊन, वारा, पावसात एकमेकांना आधार देतो.

Question 3

1 Mark

हितगुज करणाऱ्याजवळ पुढीलपैकी कोणता गुण नाहीॽ

Options

Option A is correct

कटुता ठेवणे

Option B

आनंद देणे

Option C

सहकार्य करणे

Option D

नाते जपणे

पुढील संवाद काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा. “सायब, मी दामू हाय. मला काहीतरी कामधंदा हवाय." “तू कोणते काम करु शकतोस?" “अहो ऐकलंत का? त्याला स्वयंपाक करता येतो का, हे पहिले विचारा." “हो विचारतो गं. काय रे, तुला स्वयंपाक करता येतो का?” “होय सायब, मी सगळी कामं करेन." “घरी कोण कोण आहे तुझ्या?” “मालकीणबाई सगळी हायेत. चार गुरे, दोन आंब्याची झाडं, बायको, पोरं आणि आईवडील सुद्धा." "मग तू इकडे कसा काय आला आहेस?" “कामधंद्यासाठी. पावसाच्या जोरदार माऱ्यानं सगळं नाहीसं झालं. खूप कष्ट केलं व्हतं." “हो, वाचले आहे आम्ही वर्तमानपत्रात. यावर्षीच्या पावसाने शेतीवाडीचे तुमचे खूप नुकसान झाले आहे." “होय मायबाप, सरकार कधी ओला दुष्काळ जाहीर करतंय कुणास ठाऊक." “आई, मी निघाले गं कॉलेजला. संध्याकाळी घरी यायला उशीर होईल." “आदिती, सावकाश जा. उशीर होणारच आहे तर तुझी गाडी घेऊन जा."

Question 4

1 Mark

संवादात किती जणांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला आहेॽ

Options

Option A

तीन

Option B

दोन

Option C is correct

चार

Option D

पाच

Question 5

1 Mark

संवादाची वेळ कोणती असावीॽ

Options

Option A

सायंकाळ

Option B is correct

सकाळ

Option C

पहाट

Option D

रात्र

Question 6

1 Mark

दामू कामधंदा शोधण्यासाठी शहराकडे आला कारण ...

Options

Option A

आई-बाबांना देवदर्शनासाठी पाठवण्यास पैशाची गरज होती.

Option B

मुलीच्या कॉलेजची फी भरावयाची होती.

Option C is correct

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्याने पैशांची गरज भासू लागली होती.

Option D

शहराकडे येण्याची त्याला ओढ होती.

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. आपला राष्ट्रीय ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. आयताकृती आकाराचा हा तिरंगा ध्वज राष्ट्रीय निशाण आहे. तो तीन रंगानी तीन समान भागात सजलेला आहे. या प्रत्येक भागाला विशिष्ट अर्थ आहे. भारतीय ध्वज एकतेचे प्रतीक आहे. राष्ट्रध्वजाचा सर्वात वरचा केशरी रंग हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले रक्त सांडले त्यांच्या त्यागाची आठवण करून देतो. देशाप्रती धैर्य आणि निःस्वार्थीपणा दर्शवतो. मधला पांढरा रंग राष्ट्राची शांतता, पवित्रता, शुद्धता व साधेपणा दाखवतो. तो सर्वांना सामावून घेतो. सर्वात खालचा रंग हिरवा. तो हरित शामल भूमातेला समृद्ध करणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे, देशाच्या भरभराटीचे, समृद्धीचे द्योतक आहे. सतत परिश्रम करा असा संदेश तो देतो. मध्यभागी असलेले निळया रंगाचे अशोकचक्र हे शांतीचे, अहिंसेचे व सद्गुणांचे प्रतीक आहे. आपल्या देशाची थोर परंपरा, संस्कृती याचे निदर्शक आहे. सतत कार्यरत रहा, गतीमान रहा, वेळ वाया घालवू नका असा संदेश ते देते.

Question 7

1 Mark

अशोकचक्र पुढीलपैकी कोणता संदेश देत नाही?

Options

Option A

सतत कार्यरत रहा.

Option B is correct

परिश्रम करू नका

Option C

गतिमान रहा.

Option D

वेळेचा अपव्यय करू नका.

Question 8

1 Mark

देशासाठी बलिदान करणाऱ्यांच्या त्यागाची आठवण करून देणारा रंग कोणता?

Options

Option A

पांढरा

Option B

निळा

Option C

हिरवा

Option D is correct

केशरी

Question 9

1 Mark

वाक्यपूर्ती होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पांढरा रंग हा ______

Options

Option A

समृद्धीचे द्योतक आहे.

Option B

सद्गुणांचे प्रतीक आहे.

Option C

शेतकऱ्यांच्या कष्टाचे वर्णन करतो.

Option D is correct

शांतता व साधेपणा दाखवतो.

पुढे सुसंगत परिच्छेदाची तीन वाक्ये दिली आहेत. त्या परिच्छेदाची वाक्ये अर्थपूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. पौश महिन्यात येणारा सण म्हणजे ______ हा होय. या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना ______ देतात. याच दिवशी सूर्य ______ राशीत प्रवेश करतो.

Question 10

1 Mark

पौश महिन्यात येणारा सण म्हणजे ______ हा होय.

Options

Option A

नागपंचमी

Option B

गुढीपाडवा

Option C is correct

मकर संक्रांत

Option D

विजयादशमी

Question 11

1 Mark

या सणाला स्नेहाचे प्रतीक म्हणून सर्वजण एकमेकांना ______ देतात.

Options

Option A

आपट्याची पाने

Option B is correct

तिळगुळ

Option C

गुळखोबरे

Option D

कडुलिंबाची पाने

Question 12

1 Mark

याच दिवशी सूर्य ______ राशीत प्रवेश करतो.

Options

Option A

मीन

Option B

कर्क

Option C is correct

मकर

Option D

कुंभ

खालील उतारा वाचून त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पर्यायांमधून निवडा. शरीराला श्रम घडवणारी कृती म्हणजे व्यायाम. पण कष्ट आणि व्यायाम यामध्ये फरक आहे. व्यायामाने शरीराची वाढ सुदृढ होते तर कष्टामुळे शरीराची झीज होते. व्यायाम करण्याची उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सकाळ शक्य नसल्यास संध्याकाळी केला तरी उत्तम. व्यायामामुळे पचन सुधारण्यास मदत होते, आळस नाहीसा होतो, व्यायामाचे फायदे हळूहळू पण निश्चित व आयुष्यभर मिळणारे असतात.

Question 13

1 Mark

व्यायामामुळे शरीराला कोणता लाभ होत नाही?

Options

Option A

शरीर सुदृढ बनते.

Option B is correct

शरीराची झीज होते.

Option C

आळस नाहीसा होतो.

Option D

पचन सुधारण्यास मदत होते.

Question 14

1 Mark

वरील उताऱ्यानुसार व्यायाम कोणत्या वेळी करावा? A) सकाळी B) उत्तम वेळी C) संध्याकाळी

Options

Option A

फक्त B

Option B

फक्त A

Option C is correct

फक्त A आणि C

Option D

फक्त A आणि B

Question 15

1 Mark

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उताऱ्यात आलेला नाही?

Options

Option A

जीवन

Option B

साहाय्य

Option C

नफा

Option D is correct

उत्साह

खालील कविता वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा. जंगलात एकदा सभा भरली, प्राणी मंडळी सगळी जमली । उड्या मारत आला ससा, म्हणाला 'सगळे चूप बसा’ । दचकत दचकत आले हरिण, म्हणाले, 'मी भाषण करेन' । जिराफ आले हालवत पाठ, मान करून बसले ताठ । फांद्यांवरून माकड आले, सगळे प्राणी शांत झाले । गेंडा, अस्वल, हत्ती आले, सगळे जण खाली बसले । वनराजांनी गर्जना केली, म्हणाले 'सभा आता सुरू झाली’ ।

Question 16

1 Mark

सभेत भाषण कोण करणार होते?

Options

Option A is correct

हरिण

Option B

ससा

Option C

अस्वल

Option D

माकड

Question 17

1 Mark

कवितेत किती प्राण्यांची नावे आली आहेत?

Options

Option A is correct

आठ

Option B

सात

Option C

सहा

Option D

पाच

Question 18

1 Mark

पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही?

Options

Option A is correct

खग

Option B

मृग

Option C

केसरी

Option D

अरण्य

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचा योग्य पर्याय निवडा: एका सुंदर नदीकाठी ऋषीमुनींचा आश्रम होता. आश्रमात अनेक विद्यार्थी गुरुंजवळ वेदाध्ययन करत असत. दररोज सकाळी गुरुंच्या पर्णकुटीतून स्वाहा स्वाहाचा घोष ऐकू येत असे. त्याचबरोबर आंतरिक पापांना धुणाऱ्या सुवासिक धुरांची वलये आकाशात जाताना दिसत असत. रोज सकाळी आश्रमातल्या वृक्षांवर झोके घेणाऱ्या पक्ष्यांच्या किलबिलाटानी आश्रमाचा आसमंत भरून जात असे. रोज सकाळी काही शिष्य वेदोच्चार करत असत तर काही वृक्षांना पाणी घालत असत. काही शिष्य अर्ध्य देण्यासाठी फुले वेचत असत. काही आश्रमातले रस्ते साफ करत असत. कोणी एखादा झाडाच्या फांदीवर कपडे वाळत घालताना दिसे. दुसरा एखादा वृक्षांच्या सावलीत ध्यानमग्न झालेला दिसे. रोज सकाळी ऋषीपत्नी पर्णकुटीच्या पडवीत बसून पाडसांना दर्भ व दुर्वांचा चारा भरवत ती पाडसेही तिथे मजेत बागडत असत.

Question 19

1 Mark

आश्रमाचा परिसर कोणत्या आवाजाने भरून जात असे?

Options

Option A

झऱ्याची झुळझुळ

Option B

गाईचे हंबरणे

Option C is correct

पक्ष्यांची किलबिल

Option D

लाटांची सळसळ

Question 20

1 Mark

आश्रमातील शिष्य कोणती गोष्ट करताना दिसत नाहीत?

Options

Option A

फुले गोळा करताना

Option B

झाडांना पाणी घालताना

Option C

वेदांचा उच्चार करताना

Option D is correct

कपडे धुवत असताना

Question 21

1 Mark

सकाळी ऋषींची पत्नी काय करत असे?

Options

Option A is correct

वासरांना चारा भरवत असे

Option B

गाईंची धार काढत असे

Option C

सडासारवण करत असे

Option D

झाडाखाली बसून ध्यान करत असे

पुढील कविता काळजीपूर्वक वाचा. त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा पर्याय निवडा. हिरव्यागार माळावर कोण उभे जोडुनि कर । आसमंत हा भरून जाई ऐकू येती मंजूळ स्वर ।।डोंगराआडून दिनकर येतो दाखवित चेहरा । देतो संदेश आलो मी, नैराश्य सारे तुम्ही विसरा ।। झुळझुळ वाहे निर्मल जल कोसळती शुभ्र झरे । 'जीवन देणे कामच माझे' सरिताला हे नित्य स्मरे ।। प्राजक्ताचा सडा पसरला गंधित झाला वारा। मोह तयाचा पडतो मना, गोळा करु तो दोन्ही करा ।। मोहमयी हे रुप सृष्टीचे रोज रोज दिसे आम्हां । पुन्हा अनुभवाया हे चित्र; वाट पाहतो दिवस नवा ।।

Question 22

1 Mark

कवितेत आलेले वर्णन कोणत्या वेळचे आहे?

Options

Option A

रात्र

Option B

दुपार

Option C is correct

सकाळ

Option D

संध्याकाळ

Question 23

1 Mark

'वारा' कोणामुळे सुगंधित झाला?

Options

Option A

झऱ्याच्या कोसळण्याने

Option B is correct

पारिजातकांच्या फुलांमुळे

Option C

मंजूळ स्वरांमुळे

Option D

सूर्याच्या उगवण्याने

Question 24

1 Mark

खालील कोणती शब्दांची जोडी कवितेतील वर्णनानुसार चुकीची आहे?

Options

Option A

निर्मल जल

Option B

हिरवागार माळ

Option C

नवा दिवस

Option D is correct

शुभ्र धारा

खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा. रुखीचे आईवडील शेताची आणि घरची कामे करत असत. रुखी गुरांना चारापाणी देई. शेण काढी. वासरांवर तर तिचा खूप जीव होता. ती तिची भावंडंच होती जणू ! त्यांना ती येताजाता मायेनं गोंजारी. एकदा काय झालं, रुखीचे आईबाबा शेजारच्या गावात बाजाराला गेले. घरात रुखी एकटीच होती. अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा बांधला होता. रुखी मजेत गाणी म्हणत, झोके घेत होती. इतक्यात तिला गोठ्यातून गाईंच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. म्हशीही रेकत होत्या, मोती जोरजोराने भुंकत होता. रुखीने गोठ्याकडे बघितले. गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता. गंजीने पेट घेतला होता. तसे पाहिले, तर आपली रुखी फक्त बारा वर्षाचीच होती; पण किती हुशार आणि धीराची होती ती! गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली, गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता. वासरे दावणीला हिसके देत होती. सर्वांत आधी रूखीने लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले. भराभर वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली. त्यांचा जीव वाचला.

Question 25

1 Mark

उताऱ्यात कोणता ध्वनीदर्शक शब्द आलेला नाही?

Options

Option A is correct

गोंजारणे

Option B

भुंकणे

Option C

हंबरणे

Option D

रेकणे

Question 26

1 Mark

वासरे काय करत होती?

Options

Option A

चारा खात होती

Option B is correct

दावणीला हिसके देत होती

Option C

उड्या मारत होती

Option D

दूध पित होती

Question 27

1 Mark

उताऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?

Options

Option A

रुखी झोपाळ्यावर झोके घेत होती

Option B

रुखी गुरांची काळजी घेत असे

Option C

रुखीचा वासरांवर खूप जीव होता

Option D is correct

वासरांनी दावण्या तोडल्या

पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. पावसा रे, थांब कसा! बंद दारे, बंद सारे, कोंडून मी राहू कसा ? परसात जाऊ कसा? जास्वंदीचे लाल फूल, हात त्याला लावू कसा? अंगणात जाऊ कसा? कागदाच्या होड्या छान, पाण्यापाशी नेऊ कसा? शाळेमध्ये जाऊ कसा? धडा माझा तोंडपाठ, दहापैकी दहा घेऊ कसा? मैदानात जाऊ कसा, चेंडूफळी कोपऱ्यात, मुकाट्याने पाहू कसा? बाबा आले! थांब कसा! ठोक देतील रागाने, रडशील ढसा ढसा!

Question 28

1 Mark

मुलगा फूलाला स्पर्श करु शकत नाही कारण?

Options

Option A

फूल खूप उंचावर आहे

Option B

फुलाभोवती काटे आहेत

Option C is correct

सतत पाऊस पडत आहे

Option D

सर्वत्र चिखल आहे

Question 29

1 Mark

बाबा कोणाला रडवतील?

Options

Option A

मुलाला

Option B

फुलाला

Option C is correct

पावसाला

Option D

आईला

Question 30

1 Mark

कवितेतील वर्णनानुसार मुलाला काय करायचे नाही?

Options

Option A is correct

कोंडून राहणे

Option B

पाण्यात होड्या सोडणे

Option C

क्रिकेट खेळणे

Option D

पूर्ण गुण मिळवणे

खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा. माणसांच्या घरांमध्ये खूप विविधता आढळते. काही पक्षी व प्राण्यांच्या घरांमध्येही विविधता आहे. मुंगी, मधमाशी, सुगरण व सुतारपक्षी अशी अनेक उदाहरणे आहेत. यांची घरे पाहिली की, आश्चर्याने तोंडात बोट घालण्याची वेळ येते. मुंग्यांचे निवासस्थान म्हणजे वारूळ. या आदर्श घराची आतील रचना आखीव-रेखीव असते. कितीही पाऊस पडला तरी पाण्याचा एक थेंबही आत जात नाही. मधमाश्यांचे घर म्हणजे पोळे. त्याला मोहोळ असेही म्हणतात यात सुरेख खोल्या असतात. सुगरण पक्षी वाळलेले गवत, चिवट वेलीचे तंतू यांपासून चोचीने सुरेख घरटे विणतो. त्याला 'खोपा' म्हणतात. हे निमुळते घरटे त्यांच्या पिलांचे ऊन, वारा, पाऊस, साप, ससाणे यांपासून संरक्षण करते. सुतारपक्षी आपल्या अणकुचीदार चोचीने झाडाच्या खोडामध्ये घरटे तयार करतो. निसर्गातील या इवल्या कारागिरांच्या कलाकृतींचे मनापासून कौतुक वाटते.

Question 31

1 Mark

सुगरणीचा खोपा पिलांचे कोणापासून संरक्षण करतो?

Options

Option A

मुंग्या, मधमाशी

Option B

मधमाशी, सुतारपक्षी

Option C

सुतारपक्षी, मुंग्या

Option D is correct

साप, ससाणे

Question 32

1 Mark

कोणाच्या घराची रचना अनेक खोल्यांची असते?

Options

Option A

सुतारपक्षी

Option B is correct

मधमाशी

Option C

मुंगी

Option D

सुगरण

Question 33

1 Mark

मुंग्यांच्या घराच्या बाबतीत चुकीचे विधान कोणते?

Options

Option A

मुग्यांच्या घराला वारूळ म्हणतात.

Option B

या घराची रचना आखीव-रेखीव असते.

Option C is correct

मुंग्यांचे घर हे आदर्श नसते.

Option D

या घरात पावसाचा थेंबही जात नाही.

खालील कविता वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा: गोड गोड आठवणींचे उठते मोहोळ, गोड गोड शहाळी तसे माझे आजोळ! रोज सकाळी उठवते आम्हां मामाच्या मोटेची सनई, घुंगुर वाजवत रानात पळत जातात गाई. खिडकीमधून सकाळी वारा घालतो शीळ, पारिजातकाचा गंध घालून जातो भूल. सूरपारंब्या, आट्यापाट्या, छप्पापाणी आणि लगोरी, अभ्यासाला तेथे कायमचीच कुलूप तिजोरी. रागीट आमचे आजोबा जणू फणसाचे गरे, रामरक्षा म्हटल्यावर खाऊ देतात बरे.

Question 34

1 Mark

मुलांना सकाळी कोण उठवते?

Options

Option A

घुंगराचा आवाज

Option B is correct

मोटेचा आवाज

Option C

शीळ

Option D

आजोबा

Question 35

1 Mark

मुलांना आजोबा केव्हा खाऊ देतात?

Options

Option A is correct

रामरक्षा म्हटल्यावर

Option B

गाईना रानातून आणल्यानंतर

Option C

खेळून आल्यानंतर

Option D

अभ्यास केल्यानंतर

Question 36

1 Mark

मुलांना कोण भुरळ घालून जातो?

Options

Option A

वाऱ्याची शीळ

Option B is correct

पारिजातकाचा सुगंध

Option C

फणसाचे गरे

Option D

गोड शहाळी

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखालील प्रश्नांच्या उत्तराचा अचूक पर्याय निवडा. निसर्गाची नानाविधरूपे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रूप बदलत असते. त्याचा मानवाप्रमाणेच सर्व सजीवांना आपल्या विकासासाठी उपयोग होतो. तो निरपेक्षपणे आपले सर्वस्व प्राणीमात्रांना बहाल करतो. आपले तर जीवनच पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वनस्पती फळे, फुले, निवाऱ्यासाठी लाकडे, शुद्ध हवा एवढेच नव्हे तर उन्हाच्या झळांपासून संरक्षणासाठी सावली सुद्धा देतात. औषधी वनस्पती, इमारती लाकडासाठीच्या वनस्पती, कापडासाठी कापूस देणारी पिके, कागद, रबरी वस्तू बनवण्यासाठी उपयोगी वृक्ष या प्रमाणेच इंधनासाठी लाकडे देणाऱ्या वनस्पतीच असतात. वनस्पतीप्रमाणेच प्राण्यांचाही माणसाला खूप उपयोग होतो. अन्नातील दूध, मांस, अंडी यांसारखे पदार्थ, वाहतुकीसाठी उपयोगी पडणारे प्राणी केस किंवा चामड्याच्या वस्तूसुद्धा प्राण्यांपासून मिळतात. समुद्रातील मासे, शंखशिंपले किंवा मीठ सुद्धा आवश्यकच आहे. पाऊस तर सर्वच सजीवांचे जीवन फुलवतो. नद्यांचा प्रवाह शेतीवाडीला संजीवनी देतो. काही ठिकाणी नद्यांचा अंतर्गत वाहतुकीसाठी उपयोग होतो. खरोखर निसर्ग मानवाचा खराखुरा मित्रच आहे.

Question 37

1 Mark

उताऱ्यातील वर्णनानुसार हवेच्या शुद्धिकरणात पुढीलपैकी कोणाची भूमिका महत्त्वाची आहे ?

Options

Option A is correct

झाडे

Option B

पाऊस

Option C

नद्या

Option D

मानव

Question 38

1 Mark

कपडे तयार करण्यासाठी उताऱ्यातील वर्णनानुसार कशाचा उपयोग होतो?

Options

Option A

झाडाच्या साली

Option B

झाडाची पाने

Option C is correct

कापूस

Option D

कातडी

Question 39

1 Mark

उताऱ्यातील वर्णनानुसार सर्व सजीवांच्या जीवनमानावर परिणाम करणारी बाब कोणती?

Options

Option A is correct

नद्या

Option B

समुद्र

Option C

इमारत

Option D is correct

पाऊस