Source: Previous Question Papers

खालील उतारा वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा. रुखीचे आईवडील शेताची आणि घरची कामे करत असत. रुखी गुरांना चारापाणी देई. शेण काढी. वासरांवर तर तिचा खूप जीव होता. ती तिची भावंडंच होती जणू ! त्यांना ती येताजाता मायेनं गोंजारी. एकदा काय झालं, रुखीचे आईबाबा शेजारच्या गावात बाजाराला गेले. घरात रुखी एकटीच होती. अंगणात एका मोठ्या झाडाच्या फांदीला झोपाळा बांधला होता. रुखी मजेत गाणी म्हणत, झोके घेत होती. इतक्यात तिला गोठ्यातून गाईंच्या हंबरण्याचा आवाज ऐकू आला. म्हशीही रेकत होत्या, मोती जोरजोराने भुंकत होता. रुखीने गोठ्याकडे बघितले. गवताच्या गंजीतून भकाभका धूर निघत होता. गंजीने पेट घेतला होता. तसे पाहिले, तर आपली रुखी फक्त बारा वर्षाचीच होती; पण किती हुशार आणि धीराची होती ती! गंजी पेटल्याचे लक्षात येताच पटकन घरात जाऊन तिने मोठा सुरा आणला आणि गोठ्यात धावत गेली, गोठ्यात सगळीकडे धूर झाला होता. वासरे दावणीला हिसके देत होती. सर्वांत आधी रूखीने लहान वासरांच्या दावणीचे दोर कापून टाकले. भराभर वासरे गोठ्याच्या बाहेर पळत सुटली. त्यांचा जीव वाचला.

वासरे काय करत होती?

Options

Option A

चारा खात होती

Option B is correct

दावणीला हिसके देत होती

Option C

उड्या मारत होती

Option D

दूध पित होती