Source: Previous Question Papers
आठवणीच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते गंकधी आकाशी कधी जळातुनी सैर करुनी येते गंनीळनिळुल्या रानफुलांचा बहर आला म्हणते गंहिरव्या हिरव्या मऊ तृणावर लोळण घेऊन येते गंमाझे मन हे माझे न राहता बनते जणू ते संदूक गं सुखद, कटू अन् मजेशीर या आठवणी ते सांडते गं कशी तुला सांगू मी सखे आसवे भरती डोळ्यांतबालपणीच्या काळामधल्या आठवणीचा हिंदोळा गं
कवितेतील मुलीच्या डोळ्यांत अश्रू का येतात ?
Options
Option A
घराबाहेर जाण्यावर बंधने आल्यामुळे
Option B
रानफुलांचा बहर मावळल्यामुळे
Option C is correct
बालपणीच्या मैत्रिणींच्या आठवणी आल्यामुळे
Option D
कटू आठवणी उचंबळून आल्यामुळे