Questions & Answers: "Reading Comprehension"

Complete guide to "Reading Comprehension" for Marathi students. Below you will find important questions and model answers to help you prepare.

24 Questions

Want to Test Your Knowledge?

Try our interactive quiz on this topic to get instant AI feedback.

Take Topic Quiz

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा व त्याखालील विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. रवींद्रनाथ टागोर या महाकवीचं स्वातंत्र्याचं स्वप्न मंगल आणि उदात्त होतं. रवींद्रनाथांचा व्यासंग फार मोठा होता. सतत वाचन करणं हा त्यांचा छंद होता. रवींद्रनाथ जसे थोर कवी होते तसेच ते थोर कांदबरीकार, कथाकार, नाटककार, विचारवंत, चित्रकार व संगीतकारही होते. शाळेच्या घराच्या चार भिंतीआड त्यांचं मन रमत नव्हते. निसर्गात रवींद्रनाथ जास्त रमत. फुलं, फुलपाखरं, पक्षी, झाडं यांचं त्यानां विलक्षण आकर्षण. जमीन, शेतं, डोंगर, नया, झरे आणि क्षितिजाला भिडणारा सागर या सान्यांविषयी रवींद्रनाथांना खूप प्रेम होतं. रवींद्रनाथांनी वंगभंग विरोधी चळवळीत सहभाग घेतला होता. 'भांडार' नावाचं मासिक ते चालवत असत. खेड्यांमधून पसरलेला भारताचा विकास होण्यासाठी ग्रामोद्धार व्हायला हवा याची त्यांना जाणीव होती, म्हणूनच त्यांनी शांतीनिकेतनला जोडून ‘श्रीनिकेतन' उघडलं. ग्रामोद्धाराच्या केंद्रात शेती, गो-पालन, चर्मोदयोग, हातमाग, कलाकुसरीचं काम या व्यवसायाचं शिक्षण दिल जाऊ लागलं. त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहामुळे सारं जग त्यांना ओळखू लागले. याच काव्याला नोबेल पारितोषिक मिळालं आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' हा किताब दिला. रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्त्वातील एकत्वाचा सुंदर अविष्कार म्हणजे त्यांचे जनगणमन हे गीत. स्वतंत्र भारताचे ते राष्ट्रगीत आहे.

Question 1

1 Mark

'रवींद्रनाथ टागोर' यांच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

Options

Option A

त्यांनी गीतांजली काव्यसंग्रह लिहिला आहे.

Option B is correct

त्यांनी भूदान चळवळीत सहभाग घेतला होता.

Option C

त्यांचे जनगणमन हे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत आहे.

Option D

त्यांचा व्यासंग फार मोठा होता.

Question 2

1 Mark

रवींद्रनाथांनी शांतिनिकेतनला जोडून श्रीनिकेतन उघडलं कारण

Options

Option A is correct

खेड्यांचा उद्धार व्हावा यासाठी

Option B

'भांडार' नावाचे मासिक सुरू करण्यासाठी

Option C

त्यांना निसर्गाचं आकर्षण होते म्हणून

Option D

त्यांना साऱ्या जगाने ओळखावे म्हणून

Question 3

1 Mark

उताऱ्यातील आशयानुसार ग्रामोद्धार केंद्रात कोणते शिक्षण मिळत नव्हते?

Options

Option A

शेती व गो-पालन

Option B

चर्मोद्योग व हातमाग

Option C is correct

संगणक शिक्षण

Option D

कलाकुसर

Shared content visual aid

पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय निवडा:

Question 4

1 Mark

'शरद ऋतू' हा मुलांसाठी आनंदाची पर्वणी का असतो?

Options

Option A

वसुंधरा पावसात भिजत असते.

Option B

थंडी ओसरलेली असते.

Option C

कोकीळ गाणे गात असतो.

Option D is correct

अनेक सणांची रेलचेल असते.

Question 5

1 Mark

कोकीळ आनंदाने जेव्हा गाऊ लागतो ?

Options

Option A

आकाशात मेघ जमल्यावर.

Option B is correct

निसर्ग पानांफुलांनी बहरल्यावर.

Option C

पावसात चिंब भिजल्यावर.

Option D

रात्री चांदणे पडल्यावर.

Question 6

1 Mark

कवितेतील आशयानुसार चुकीची जोडी निवडा.

Options

Option A is correct

शिशिर - थंडीचा कडाका

Option B

ग्रीष्म - उकाडा

Option C

वर्षा - संततधार

Option D

हेमंत - धान्याचा बहर

पुढे एका सुसंगत परिच्छेदाची तीन वाक्ये दिली आहेत, ती वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडा.

Question 7

1 Mark

अवघा महाराष्ट्र त्यांना ______ या उपाधीने ओळखतो.

Options

Option A is correct

लोकमान्य

Option B

महात्मा

Option C

साने गुरूजी

Option D

पितामह

Question 8

1 Mark

त्यांनी ______ हा सार्वजनिक उत्सव लोकजागृतीसाठी सुरु केला. (अचूक उत्तराचे दोन पर्याय निवडा)

Options

Option A is correct

गणेशोत्सव

Option B

रामनवमी

Option C is correct

शिवजयंती

Option D

नवरात्र

Question 9

1 Mark

त्यांनी ______ या वृत्तपत्रातुन 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा रोखठोक सवाल ब्रिटीश सरकारला विचारला होता.

Options

Option A is correct

केसरी

Option B

साधना

Option C

दर्पण

Option D

जनसत्ता

Shared content visual aid

पुढील कविता काळजीपूर्वक वाचा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायांतून निवडा.

Question 10

1 Mark

बांबूच्या बेटातून कोणता आवाज येतो असे वर्णन कवितेत आले आहे?

Options

Option A

सनईचा

Option B

पक्ष्यांचा

Option C

शीळ घातल्याचा

Option D is correct

बासरीचा

Question 11

1 Mark

कवितेतील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?

Options

Option A

काळ्या खडकातून शुभ्र ओहळ वाहत आहेत.

Option B is correct

छोटी-छोटी वासरे हिरवळीवर बागडत आहेत.

Option C

धुक्याची चादर आकाशाला भिडते आहे.

Option D

ओला वारा गंधाचा दरवळ पसरवतो आहे.

Question 12

1 Mark

गवताचे पाते कोणता अलंकार घालून मिरवते?

Options

Option A

कर्णफुले

Option B

हिरवा शालू

Option C is correct

दवबिंदूचे डूल

Option D

कंठमणी

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचा. त्याखाली विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा. नृत्यकलेचा जन्म मानवाच्या जन्माबरोबरच झालेला आहे. नुकतेच जन्मलेले मूल आपल्याला हवे नको ते शब्दांच्या माध्यमातून सांगू शकत नाही; म्हणून ते आपला आनंद हातापायांची हालचाल करून व्यक्त करते. एखादी गोष्ट जेव्हा त्याला नकोशी वाटते. तेव्हाही ते आपली नाराजी रडून व हातपाय झाडून व्यक्त करते. चालते, बोलते मूलही आपला आनंद नाचून उड्या मारूनच प्रकट करते. मोठी माणसेदेखील आनंदाच्या क्षणी उत्स्फूर्तपणे नाचू लागतात. याचाच अर्थ नृत्य हे माणसाच्या जीवनात उपजतच आहे, असा होतो. निसर्गातून तसेच पशु-पक्ष्यांच्या जीवनातूनही मानवाला नृत्याची प्रेरणा मिळते. वाऱ्यामुळे पानांची हालचाल विशिष्ट प्रकारे होते. वर्षा ऋतूत बिजलीचे नृत्य सुरू होते. अळवाच्या पानावर जलबिंदू नाचत राहतात. सागराच्या पृष्ठभागावर लाटांचे अखंड नृत्य सुरू असते. पावसाची शक्यता निर्माण होताच मोर आपला पिसारा फुलवून नाचू लागतो. अशाप्रकारे निसर्गात सर्वत्र भरून राहिलेल्या नर्तन क्रियेने माणसात या कलेविषयी ओढ निर्माण झाली. माणसाने या नाचत्या निसर्गाचे अनुकरण करता करता या कलेचा हळूहळू विकासही झाला.

Question 13

1 Mark

बोलताही न येणाऱ्या बाळाची कोणती हालचाल निराशा दर्शवते?

Options

Option A

हात उंचावणे

Option B is correct

हातपाय झाडणे

Option C

खुदूखुदू हसणे

Option D

पुढे पुढे सरकणे

Question 14

1 Mark

पुढीलपैकी कोणते वर्णन नाचण्यातून आनंद व्यक्त करताना आलेले आहे? (अ) वाऱ्यामुळे पानांची हालचाल होणे. (ब) वर्षा ऋतूतील वीजेचे नृत्य. (क) अळवाच्या पानावरील जलबिंदूची हालचाल. (ड) पावसाच्या शक्यतेने मोर नाचणे.

Options

Option A is correct

'अ', 'ब', 'क' आणि 'ड' बरोबर

Option B

'अ', 'ब', आणि 'ड' बरोबर

Option C

'ब', 'ड' आणि 'क' बरोबर

Option D

'अ', 'क' आणि 'ड' बरोबर

Question 15

1 Mark

‘रडतखडत’ या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द उताऱ्यात आला आहे?

Options

Option A

उपजत

Option B

विशिष्ट

Option C is correct

उत्स्फूर्त

Option D

नाराज

पुढे एका सुसंगत परिच्छेदाची तीन वाक्ये दिली आहेत. परिच्छेदाची वाक्ये पूर्ण करण्यासाठी योग्य शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा:

Question 16

1 Mark

______ दिवस जवळ आले होते. (दोन अचूक पर्याय निवडा.)

Options

Option A

सुगीचे

Option B is correct

मान्सूनचे

Option C

सणासुदीचे

Option D is correct

पावसाळ्याचे

Question 17

1 Mark

प्रत्येकजण ______ आतुरतेने वाट पाहत होते.

Options

Option A

उमेदवाराची

Option B

गणेशोत्सवाची

Option C

काढणीची

Option D is correct

पर्जन्याची

Question 18

1 Mark

आणि एके दिवशी दुपारी वादळी वाऱ्यासह ______ येताच शेतकन्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही.

Options

Option A is correct

जलधारा

Option B

गारपीट

Option C

मिरवणुका

Option D

धान्याच्या गोण्या

पुढील उतारा काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा. माणसाच्या गरजा दोन प्रकारच्या असतात. एक आर्थिक व दुसरी सामाजिक. पैसा, सुख, सत्ता, प्रतिष्ठा वगैरे गोष्टी पहिल्या प्रकारात येतात. दुसऱ्या प्रकारात सचोटी, ज्ञान, न्याय, खेळीमेळीने वागणे, सहानुभूती, दुसऱ्याचे नीट समजून घेणे, निःपक्षपातीपणा, सेवा इत्यादी गोष्टी येतात. काही उत्कृष्ट वस्तू पैशाने विकत घेता येतात; पण मनाचे व हृदयाचे समाधान, सुख व शांती, सद्भाव व सदिच्छा या गोष्टी बाजारात मिळत नाहीत. धनाच्या राशी ओतल्या, तरी त्या लाभत नाहीत आणि याच गोष्टी सर्वांना हव्या असतात. आपण आधी माणूस आहोत, म्हणूनच सौंदर्याचे प्रेम, मनाचा विकास वगैरे गोष्टी आपल्याला आकर्षित करत असतात; म्हणून आपण समाधान व मनाचे स्वातंत्र्य यालाच महत्त्व दिले पाहिजे.

Question 19

1 Mark

'सत्ता' ही कोणत्या प्रकारची गरज आहे?

Options

Option A

राजकीय

Option B

शैक्षणिक

Option C is correct

आर्थिक

Option D

सामाजिक

Question 20

1 Mark

'आपपरभाव' या शब्दाचा कोणता विरुद्धार्थी शब्द वरील उताऱ्यात आला आहे?

Options

Option A

न्याय

Option B is correct

निःपक्षपातीपणा

Option C

खेळीमेळी

Option D

सहानुभूती

Question 21

1 Mark

उताऱ्यातील वर्णनानुसार असत्य विधान कोणते?

Options

Option A

दुसऱ्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे.

Option B is correct

पैशांनी सुख मिळवता येते.

Option C

न्याय ही सामाजिक गरज आहे.

Option D

काही वस्तू मोबदला देऊन मिळवता येतात.

Shared content visual aid

पुढील कविता काळजीपूर्वक वाचून त्याखाली विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.

Question 22

1 Mark

बदला कोण घेत आहे?

Options

Option A is correct

वारा

Option B

शीड

Option C

लाटा

Option D

सागर

Question 23

1 Mark

'प्रकाश' या शब्दाबद्दल अधिक माहिती देणारा कोणता शब्द कवितेत आला आहे?

Options

Option A

प्रचंड

Option B

रुसलेला

Option C is correct

हिरवा

Option D

गुदमरलेला

Question 24

1 Mark

कवितेतील वर्णनानुसार अयोग्य विधान कोणते?

Options

Option A

ढगांत चांदण्या अस्वस्थ झाल्या आहेत.

Option B

सर्वत्र लाटा उसळल्या आहेत.

Option C

किरणांचा पसारा देवदूताने उघडला आहे.

Option D is correct

मनात कोणतीही आशा धरू नये.