Source: Previous Question Papers
आठवणीच्या हिंदोळ्यावर मन माझे झुलते गंकधी आकाशी कधी जळातुनी सैर करुनी येते गंनीळनिळुल्या रानफुलांचा बहर आला म्हणते गंहिरव्या हिरव्या मऊ तृणावर लोळण घेऊन येते गंमाझे मन हे माझे न राहता बनते जणू ते संदूक गं सुखद, कटू अन् मजेशीर या आठवणी ते सांडते गं कशी तुला सांगू मी सखे आसवे भरती डोळ्यांतबालपणीच्या काळामधल्या आठवणीचा हिंदोळा गं
कवितेतील वर्णनानुसार अयोग्य विधान कोणते ? (दोन अचूक पर्याय निवडा.)
Options
Option A is correct
मखमली गवतावर मन निवांत निद्रा घेते.
Option B
कवितेतील मुलीचे मन पाण्यातून विहार करते.
Option C
कवितेतील मुलीचे मन जुन्या आठवणींच्या झुल्यावर झोके घेते.
Option D is correct
मोठेपणी काही कटू आठवणी एकवटल्या जातात.