Source: Previous Question Papers

वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखांची थोडीच असते ? दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला, की लक्षात येतं. एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते, तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या, तर त्यांचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास घट्ट करायला शिकतो. ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आणि वाटतं, की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी. थोडी तडफड भोगायला लागावी; तरच सुखाची चव वाढेल. यशाची गोडी वाढेल. प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.

उताऱ्यातील वर्णनानुसार वाट पाहताना पुढीलपैकी कोणत्या गोष्टीचा अनुभव येत नाही ?

Options

Option A

विश्वास संपादन करणे

Option B

संयम धरणे

Option C is correct

तृप्ती होणे

Option D

धीर धरणे