वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखांची थोडीच असते ? दुःख, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा किंवा विठूच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला, की लक्षात येतं. एखाद्या गोष्टीची वाट पाहायला लागते, तेव्हाच तिची किंमत कळत जाते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या, तर त्यांचं मोलच आपल्या लक्षात येत नाही. वाट पाहताना आपण संयम शिकतो, धीर धरायला शिकतो. एखाद्या गोष्टीवर विश्वास घट्ट करायला शिकतो. ध्यास वाढत जातो. हे सगळं एका वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येतं आणि वाटतं, की जे हवं ते सहज हाती येऊच नये. थोडी वाट पाहायला लागावी. थोडी तडफड भोगायला लागावी; तरच सुखाची चव वाढेल. यशाची गोडी वाढेल. प्रेमातली, मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल.
उताऱ्यातील वर्णनानुसार सत्य विधान कोणते ?
Options
सहज मिळालेल्या गोष्टीचे मोल अधिक वाटते.
'वाट पहाणे' ही गोष्ट फार सुखाची असते.
वाट पहावी लागली तर आयुष्याची ओढ कमी होते.
वाट पाहण्यात भीती, दुःख व काळजी वाटते.